लासुर(चोपडा), 5 ऑगस्ट : चोपडा तालुक्यातील लासुर येथे श्री क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ अतंर्गत गुण गौरव समिती आयोजित कार्यक्रमात माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध संस्थांमधून सेवानिवृतांचा, विविध संस्थांमध्ये निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री.ए.के.गंभीर सर होते. प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक वक्ते म्हणून शिरपूर येथील श्री.प्रवीण शांताराम माळी सर होते.
कार्यक्रमात GTS परीक्षा, इ.10 वी, 12 वी (sci,com.), BAMS, B.Pharm, B.Tech., M.B.A, B.E., B.C.A, L.L.B यात सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन त्यांचा पालकांसोबत गौरव करण्यात आला. तसेच विविध संस्थांमधून सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांचा सन्मानपत्र, शाल व बुके देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध संस्थांमध्ये निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार, शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला.
कार्यक्रमात मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण महाजन, सचिव सुरेश माळी, सहसचिव अरुण माळी, लो.ऑ. गोविंदराव माळी, सदस्य बाबूलाल महाजन, देविदास मगरे, भिकन माळी, भास्कर महाजन, डॉ. राजेंद्र महाजन, रमेश महाजन, नामदेव माळी, प्रमोद, मगरे, सुरेश माळी, रविंद्र माळी, संतोष माळी, साखरलाल महाजन, संत सावता महाराज पतसंस्थे चेअरमन शंकर माळी, वि. का.सोसा. चेअरमन सुरेश महाजन, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन वासुदेव महाजन व त्यांचे संचालक मंडळ तसेच समाज बांधव व माता-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणगौरव समिती प्रमुख एच.एच.माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिती सचिव सी.ए.महाजन व समिती सदस्य के.एस.महाजन यांनी केले व आभार समिती उपप्रमुख रविकांत मगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्य कैलास माळी, ए.जे.महाजन, रविंद्र माळी, कुंदन साळुंखे, जितेंद्र महाजन, विनोद महाजन, प्रेमराज शेलकर यांनी मेहनत घेतली.