जळगाव : मुख्यमंत्री लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत आज जळगावात महिला संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहरातील मंगळवारी शहरातील सागर पार्क मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ३५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
असे आहे नियोजन –
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 300 बस या या महिलांसाठी तसेच 50 बस या जिल्हा व तालुकास्तरीय समिती सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून महिलांना या मेळाव्यासाठी आणता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यासह अनेक आमदारांवरही, तसेच महत्त्वाच्या कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
- आगारनिहाय बसेसची संख्या
जळगाव – 50
जामनेर – 30
पाचोरा – 20
चाळीसगाव – 20
अमळनेर – 30
चोपडा – 30
यावल – 25
रावेर – 20
मुक्ताईनगर – 20
भुसावळ – 25
एरंडोल – 30
पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे –
- भडगाव, चाळीसगाव, जळगाव, पाचोरा या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसरात करण्यात आली आहे.
- जळगाव, यावल, चोपडा या तालुक्यातील ममुराबाद, कानळदाकडून २ येणाऱ्या वाहनांसाठी शिवतीर्थ मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे.
- मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या तालुक्यातून भुसावळकडून व २ जामनेरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉप मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे.
- एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव या १ येणाऱ्या वाहनांसाठी एकलव्य क्रीडा संकुल व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातून पाळधीकडून व मानराज पार्क येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन