भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कजगाव रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या रेल्वे लाइनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने मंगळवारी ब्लॉक घेतला आहे. यामुळे सहा मेल, एक्स्प्रेस गाड्या मंगळवारी विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. तर इगतपुरी, देवळाली, नाशिक-बडनेरा या 6 मेमू गाड्या रद्द केल्या आहेत.
मंगळवारी कजगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. यामुळे मंगळवारी सहा मेमू गाड्या रद्द केल्या आहे. तर सहा मेल, एक्स्प्रेस गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येतील. यात गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस 1 तास, दिब्रुगढ एलटीटी एक्सप्रेस 45 मिनिटे, एलटीटी गोरखपूर – एक्सप्रेस 1 तास 45 मिनिटे, साईनगर शिर्डी कालका एक्सप्रेस 1 तास 45 मिनिटे, एलटीटी भागलपूर एक्स्प्रेस 1 तास आणि मुंबई लखनऊ एक्स्प्रेस 30 मिनिटे रेल्वे स्थानकावर थांबण्यात येईल. दरम्यान, आधीच पावसामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यात 6 गाड्या रद्द झाल्याने गैरसोयीत भर पडेल.
या गाड्या असतील रद्द ब्लॉकमुळे मंगळवारी 11119 इगतपुरी – भुसावळ मेमू रद्द, भुसावळ – इगतपुरी मेमू, देवळाली – भुसावळ, भुसावळ-देवळाली, नासिक – बडनेरा विशेष मेमू, बडनेरा नासिक विशेष मेमू या – गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.