• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा…’, राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केला तीव्र संताप, म्हणाले…

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 27, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
raj-thackeray

राज ठाकरे फाईल फोटो

मुंबई : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, असा कोसळतोच कसा? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे –

राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटले की, ‘मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती?

आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो’, या शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

उद्या भुसावळ देवळाली, नाशिक बडनेरासह 6 मेमू रद्द; मेल, एक्स्प्रेसही थांबवले जाणार, हे आहे कारण

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chhatrapati Shivaji Maharajraj thackerayraj thackeray newsrajkot fortsindhudurg

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page