• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दोन महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा होणार दाखल, पालकमंत्र्यांनी दिले वेळेत काम करण्याचे अल्टीमेटम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 3, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
दोन महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा होणार दाखल, पालकमंत्र्यांनी दिले वेळेत काम करण्याचे अल्टीमेटम

जळगाव, 3 सप्टेंबर : दोन महिलांसह वृद्धाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांविरुद्ध (झांडू व ॲग्रो इन्फ्रा) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण मार्च 2025 पूर्ण करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचा यावेळी निर्णय झाला.

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय –
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सा.बां.विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठेकेदारा विषयी तीव्र नाराजी –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराला ‘बायपास’ च्या कामा बाबत सविस्तर विचारणा केली, त्यावेळी मार्च 2025 पर्यंत बायपासचे काम पूर्ण होईल, असे या ठेकेदाराने सांगितले. ‘यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

आमदार भोळेंनी घेतला आक्षेप –
यावेळी आमदार भोळेंनी वृद्धाच्या मृत्यूनंतर आंदोलन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यावर आक्षेप घेतला. ठेकेदाराला सोडून जनतेला वेठीस धरण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला, प्रकल्प संचालक पवार यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी ठेकेदारांविरोधात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली.

मूळ ठेकेदारांपैकी एक जण या बैठकीला उपस्थित होता. ‘बायपास’चे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी कल्याण येथील ठेकेदाराला सोबत घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम दोन ठेकेदारांकडे विभागाले गेल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

असे झाले निर्णय –
बायपास : मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी अल्टीमेटम –
गतिरोधक : विद्यापीठ, जैन इरिगेशन, बांभोरी, खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी, इच्छादेवी, अजिंठा चौफुली, कालिका माता मंदिर चौक या ९ ठिकाणी अत्याधुनिक व प्रभावी गतिरोधक उभारण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल.
जनजागृतीपत फलक : वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्याची जबाबदारी आरटीओ विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पाडली जाईल.
ठेकेदारांविरोधात कारवाई : दोन्ही महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी भा.दं.वि.304 (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी ‘न्हाई’कडून फिर्याद दिली जाईल.
आयटीआयसमोर मोरी : आयटीआयसमोरच्या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत. त्याठिकाणी मोरी बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
खड्डे भरणार : रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्यासह खड्डे भरण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल.

बांभोरी पूल धोकेदायक –
दरम्यान, या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी बांभोरी पुलाची स्थिती नाजूक झाली असल्याचा निष्कर्ष नोंदविला. वाहनांचा अवाजवी भार, अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पुलाविषय परिक्षण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

वाहतूक पोलिसांसोबत ‘आरटीओ’-
दरम्यान, शहरातील महामार्गावर असणाऱ्या धोकेदायक स्थळांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीला आरटीओ विभागाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आकाशवाणी चौकात ‘सिग्नल’ –
दरम्यान, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे यांनी दोन दिवसात आकाशवाणी चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. त्यानंतर अन्य चौकांसाठीही ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

तरसोद, पाळधी सेवारस्त्याची दुरुस्ती-
जळगावकडून भुसावळकडे जाणारी वाहतूक तरसोदनजीक खोळंबते. याठिकाणी खोलवर असलेल्या रस्त्यामुळे अडचण होत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. तिच स्थिती पाळधीनजीक असल्याचे सांगण्यात आले. या दोन्हीठिकाणी सिमेंटीकरणातून दुरुस्ती करण्याचे निर्देश ‘न्हाई’ला देण्यात आले आहेत.

हेही वाचा – “एकाला प्रस्थापित केलं आता दुसऱ्याला…”, आमदार चंद्रकांत पाटील यांची एकनाथराव खडसेंवर टीका

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon accidentjalgaon latest newsminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page