जळगाव, 6 सप्टेंबर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. असे असताना मंत्री गिरीश महाजन यांनी देखील एकनाथराव खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच जळगावात माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले डॉ. सतीश पाटील? –
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची आज जळगावात जिल्हा बैठक पार पडली. या बैठकती बोलताना माजी आमदार डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे सांगतात की मी शरद पवार साहेबांच्या पक्षात असून त्यांनी माझा राजीनामा स्विकारला नाहीये. आणि म्हणून जर तुम्ही इकडे (शरद पवार गटात) आहात तर त्यांनी सर्वात आधी श्रीराम पाटील यांची माफी मागितली पाहिजे. दरम्यान, आता खडसेंना कळून चुकलंय की, आता तिकडे काहीच राहिलं नाही आणि म्हणून पवार साहेबांशिवाय पर्याय राहिलेला नाहीये आणि म्हणून ते इकडे येत आहेत, असा टोलाही सतिश पाटील यांनी त्यांना लगावला.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे युट्यूब चॅनल सब्सस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
सतीश पाटील यांच्या वक्तव्याने ओढवला रोष –
डॉ. सतीश पाटील यांनी पुढे बोलताना त्यांच्या पक्षातील शहराच्या महिला अध्यक्षा मंगला पाटील यांच्या पक्षनिष्ठेची स्तुती केली. मात्र, गुलाबराव देवकर यांच्या पक्षनिष्ठेतेच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी रोष ओढवून घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, सतीश पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर गुलाबराव देवकर आणि त्यांच्या समर्थकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर डॉ. पाटील यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : “अमित भाईंनी जर सांगितलं तर…….,” एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले?