जळगाव, 7 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीच्या दृष्टीकोनातून पक्षप्रवेश पार पडत आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील असोदा सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या असंख्य युवकांनी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, माजी मंत्री देवकर यांनी सर्व युवकांचे पक्षाच्यावतीने स्वागत केले.
असोदा येथील ओम साई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सचिन माळी, असोदा ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, विजय भोळे तसेच धवल पाटील, योगेश पाटील, महारू कोळी, गोविंदा कोळी, शुभम पाटील, सुकलाल माळी, बंटी बारी, आदी व्यासपीठावर होते.
यांनी केला प्रवेश –
गिरीश पाटील, सागर चव्हाण, पुष्पराज सपकाळे, नरेंद्र पाटील, विशाल पाटील, कुणाल पाटील,अथर्व पाटील, गिरीश पाटील, तेजस पाटील, योगेश पाटील, राहुल मोरे, युगंधर पाटील, तुषार कोळी, विशाल बोरोले, विशाल पाटील, एकनाथ पाटील, किशोर क्षीरसागर, रवींद्र साबळे, किरण पाटील, डिगंबर इंगळे, अनिकेत गुजर, दीपक इंगळे, गणेश माळी, खेमचंद्र मुरलीधर, भगवान पाटील, एकनाथ कोळी, रवींद्र माळी, विशाल पाटील, नरेंद्र बोरोले, खुशाल पाटील, मनोज पाटील, अर्जून पाटील, गोविंद कोळी, शुभम पाटील, धनराज कोळी, गजानन सावळे, सुरेश पाटील, नितीन क्षीरसागर, तेजस पाटील, हरीष पवार, तुषार कोळी, रितेश महाजन, करणसिंग पाटील, करण पाटील, कुणाल अहिरे, स्वप्निल पाटील, विकास पाटील, गिरीश काळे, उमेश महाजन, नीलेश काळे, अमोल काळे, अक्षय महाजन आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय.