जळगाव, 10 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे काल कण्वाश्रमात ऋषीपंचमीसाठी आलेल्या भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर याठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. याठिकाणी एक घटना घडली ती म्हणजे नैतिक गायकवाड हा बालक आपल्या आईसह गिरणा नदीपात्रात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज चुकल्याने तो बुडू लागला. अशातच प्रशिक्षणार्थी पोलीस कॉन्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी समयसुचकता दाखवत वर्दीसह नदीपात्रात उडी घेत त्या बालकाचे प्राण वाचवले. या पार्श्वभूमीवर पौर्णिमा चौधरी यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत संवाद साधत सदर घटनेबाबतची माहिती दिली.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची; प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?