धरणगाव, 12 सप्टेंबर : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेकडो तरूणांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षात एकही उद्योग आणू शकले नसल्याचा आरोप पक्षात प्रवेश केलेल्या तरूणांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी पक्षाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, भवरखेडा गावाचे माजी सरपंच किरण पाटील तसेच नंदलाल पाटील, विकासभाऊ माळी, उपसरपंच खंडू रूपचंद भिल्ल, कानळद्याचे संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ‘यांनी’ केला प्रवेश –
प्रशांत रमेश भदाणे, प्रदिप यशवंत पाटील, ईश्वर गुलाब धोबी, सागर मांगो माळी, स्वामी श्यामकांत पाटील, रितेश संदिप पाटील, रितेश विकास माळी, धीरज निंबा महाजन, श्रीराम तुकाराम पाटील, योगेश योगराज माळी, अमोल रमेश पाटील, नारायण रमेश पाटील, अधिकार एकनाथ पाटील, पंकज दीपक पाटील, श्याम सीताराम माळी, भूषण सतिलाल पाटील, दीपक यशवंत पाटील, दिनेश रवींद्र पाटील, निखिल कैलास सोनवणे, खुशांत राजगुरू पाटील, रोशन सुनील पाटील, तुषार अनिल पाटील, रवींद्र विजय म्हसके, खुशाल प्रकाश पाटील, प्रमोद अशोक पाटील, रोहित प्रमोद पाटील, संजय भगवान महाजन, समाधान भारत पाटील, हर्षल संतोष बोरसे, योगेश मधुकर चौधरी, अक्षय दीपक ब्राम्हणे, मयूर कैलास पाटील, तुकाराम विठ्ठल पाटील, भूषण तुकाराम पाटील, राजगुरू संजय पाटील, कमलेश दत्तू पाटील, राकेश विरभान पाटील, सौरभ शिवाजी पाटील, राज सुर्यभान पाटील, जयेश नंदलाल पाटील, मयूर गुलाबराव पाटील, मिलिंद राजकिशोर पाटील, विजय कैलास पाटील, निकेश नंदलाल पाटील, अनिल कुंभार, भूषण सुभाष पाटील, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?