पाचोरा, 13 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील कापूस चोरीची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचोरा तालुक्यातून आता तब्बल तीन मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून तब्बल तीन मोबाईल चोरून नेले होते. यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे येथील बेबाबाई तडवी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 3 मोबाईल मोबाईल चोरुन नेले होते. चोरीची ही घटना दि. 7 जानेवारी 2023 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान घडली होती. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात 11 जानेवारी 2023 रोजी गु. र.न.8/2023 भा. द. वि. 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला असता आरोपी ही महिला असल्याचे समोर आले आहे. तसेच याप्रकरणी आरोपी रोषणबाई तडवी हिला अटक केली आहे. पोलिसांनी चोरी झालेले तीनही मोबाईल तिच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – पाचोरा तालुक्यात 7 क्विंटल कापसाची चोरी, पोलिसांची धडक कारवाई, आरोपीला अटक; वाचा सविस्तर
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम यांनी केली आहे.