• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही – अंतरसिंह आर्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 13, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही – अंतरसिंह आर्य

जळगाव, 13 सप्टेंबर : सरकारनें आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायदे केले आहेत, त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करायला लावण्याबरोबर एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही याबाबतीत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने 100 दिवसाचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी दिली.

जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या समवेत अंकीत सेन, गोवर्धन मुंडे, राजीव स्क्सेना अमृत प्रजापती हे आयोगाचे अधिकारी होते. 13 सप्टेंबर रोजी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, यावलचे उपवनसरंक्षक जमिल शेख, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

यावेळी अंतरसिंह आर्य म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसापासून ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाची सुरवात केली असून त्यात त्यांनी आपल्या आईच्या सन्मानाकरीता त्यांच्या नावे एक वृक्ष लावावा असे आवाहन देशवशियांना केले होते. त्यानुसार देशभरात ‘एक पेड मॉं के नाम’ अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग व वनविभागाने फळवृक्ष लागवडी संदर्भात पुढाकार घ्यावा. या अभियांनातर्गत सर्व ग्रामीण भागात ‘एक पेड मॉं के नाम ‘अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी विकासाच्या योजनांची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना योजनेचा लाभ द्यावा. आश्रमशाळेस महिन्यांतून एकदा भेट द्यावी. आदिवासींच्या उपजिविकेसाठी वनोपज वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच वनपट्ट्यांचे वाटपही वेळेत करण्याच्या सुचना आर्य यांनी दिल्या. त्याचबरोबर रोजगारासाठी मनेरगा अतंर्गत सर्व रस्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात यावे, जेणेकरुन रोजगाराबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. रोजगारासाठी स्थानिक पातळीवर कुकुटपालन व्यवसायाकरीता पोल्ट्रींची संख्या वाढवावी अशी सुचनाही आर्य यांनी केली.

चोपडा, यावल व रावेर तालुक्यात शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी एकलव्य स्कुलसाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमीन हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक –
दोन दिवशीय दौऱ्यात चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी येथे दिलेल्या भेटीवेळी व स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तसेच आदिवासी बांधवांसाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करुन अध्यक्ष आंतरसिंग आर्या यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

मुलाखतीची लिंक बातमीच्या खाली...कृपया नक्की पाहा आणि सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा.
मुलाखतीची लिंक बातमीच्या खाली…कृपया नक्की पाहा आणि सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा.

प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी वेवोतोलू केझो यांचा केला सन्मान-
नागालँड येथील आदिवासी समाजातून पहिल्या महिला आय.ए. एस. अधिकारी होण्याचा मान वेवोतोलू केझो यांना मिळाला असून सध्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी म्हणून जळगाव येथे रुजू आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सर्व सदस्यांना या गोष्टीचा अभिमाना असल्याचे सांगून आपल्याला व्यक्तीश: आपल्याला खुप आनंद झाल्याची भावना आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी व्यक्त केली.

या दौऱ्यात अंतरसिंह आर्य यांच्या उपस्थितीत शासकीय आदिवासी आश्रम शाळा कृष्णपूर, या शाळेकरीता वनविभागाने 1 हेक्टर जमीन 3(2 )या दाव्या अंतर्गत प्रकल्प कार्यालय यावल विभागास उपवन संरक्षक जमीर शेख यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना हस्तांतरित केली.

हेही पाहा : Video : पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची बहुप्रतिक्षित आणि स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: antar singh arya in jalgaonjalgaon latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page