• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Sharad Pawar : “संधी मिळेल तेव्हा यांच्या हातातून सत्ता काढून घ्या”, धुळ्यात शरद पवारांचे जनतेला आवाहन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
September 15, 2024
in धुळे, खान्देश
ncp sp chief sharad pawar in shindkheda dhule program

शिंदखेडा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांच्या हस्ते वारकरी, भजनी मंडळींचाही सत्कार करण्यात आला.

धुळे, 15 सप्टेंबर : आज लोकांना अनेक समस्या आहेत. महागाई सारखे ही संकट आहे. बेकारीचं संकट आहे. आजचं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही पावलं टाकत नाही. आजचं सरकार भगिनींना प्रपंच चालवायला, महागाईतून सुटका करायला जे करायला हवं त्यासाठी उपाययोजना करत नाही. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी मिळेल त्यावेळेस त्यांच्या हातातून काढून घेणे आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणे हे ऐतिहासिक काम तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला शब्द देतो हे राज्य तुम्ही आमच्या हातामध्ये द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, ह्या कामाला तुमची साथ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले.

काय म्हणाले शरद पवार –

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, आज बऱ्याच वर्षांनी तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. भर सकाळी शेतीवाडीची काम असताना सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. शिंदखेडा हा परिसर कष्टकरी शेतकऱ्यांचा परिसर आहे. काळ्या आईची सेवा करायची, उत्पादन मिळवायचं, संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची महत्त्वाची कामगिरी करायची हे काम आमचा शेतकरी राजा सतत करत असतो.

अलीकडच्या काळात जे राज्यकर्ते आहेत त्यांना शेतीसंबंधी यंकिंचितही आस्था नाही. त्यांची अशी अनेक धोरणं सांगता येतील जी धोरणं शेतकरी हिताची नाहीत. आजच्या भाषणांमध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा एका दृष्टीने जिरायत शेतकऱ्याचे पीक, सामान्य माणसाचं खाद्य. तुम्ही पिकवलेला कांदा मग तो धुळे जिल्ह्यातला असेल, नाशिकचा असेल, पुणे जिल्ह्यातला असेल, सातारा जिल्ह्यातला असेल त्या कांदा उत्पादकाला अधिकचे दोन पैसे मिळायला पाहिजेत ही तुमची मागणी रास्त आहे. तो काय मोठा बागायतदार नाही. कांदा पिकवतो, त्या कांद्याला जगाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींचे सरकार आलं आणि कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली म्हणजे ज्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतलं, दोन पैसे मिळतील म्हणून जगात पाठवायचा निकाल घेतला तर त्याच्यावर बंदी. आपल्या राज्यात काही भागांमध्ये उसाचे पीक घेतलं जातं. आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचा उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं.

उसापासूनपासून साखरनिर्मिती होते, मळीपासून इथेनॉल होतं आणि अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि मग शेतकऱ्याला उसाची किंमत ज्यादा देता येते. मोदी सरकार आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी उसातून विविध पूरक उत्पादनं घ्यायचं ठरवलं त्यावर बंधन घातली. त्यावर मर्यादा घातल्या. गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज –

आज काही लोक सांगतात आम्ही काम करो ना करू आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले. बहिणींचा सन्मान हा या देशांमध्ये प्रत्येक आनंद वाटणारा सन्मान आहे. पण आवश्यकता काय? तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचा. महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर कुठल्यातरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींवर अत्याचार झाला ही बातमी वाचायला मिळते. 1500 रुपये ठीक आहे पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या बहिणीची अब्रू वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, तिचं रक्षण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण त्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक सुरू आहे, असा मार्ग घेण्याचा निकाल जे कोणी घेतात. त्यांच्याबद्दल काय भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

यासोबतच ते म्हणाले की, 10 वर्ष शेती खात्याचा कारभार मी स्वतः सांभाळला. मी ज्यावेळी शेती खात्याचा काम हाती घेतलं, शपथ घेतली तेव्हा पहिलं काम माझ्याकडे आलं ते म्हणजे अमेरिकेतून गहू आणायचा, परदेशातून तांदूळ आणायचा. मला दुःख झालं. एका शेतकऱ्यांच्या कुटुंबात माझा जन्म झाला. माझेही आई वडील शेती करत होते. हा देश बळीराजांचा देश आहे आणि या देशातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं गहू तांदुळांचा सारखं अन्नधान्य हे परदेशातून आणायचं? ही गोष्ट आपल्याला शोभणारी नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं. गव्हाची, तांदळाची उत्पादकता आणि किंमत वाढवली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की, जो देश गहू आयात करत होता तो देश 2014 ला जेव्हा मी त्या खात्याचा काम सोडून दिलं तेव्हा तुम्हा लोकांच्या मदतीने जगातला 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश भारत झाला. आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले. जो देश परदेशातून तांदूळ आणत होता तो देश जगामध्ये एक नंबरचा तांदूळ पिकवणारा देश झाला. हे तुम्हा लोकांच्या कष्टामुळेच शक्य झालं.

यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाच्या बोज्यामुळे आत्महत्या केली आणि मी अस्वस्थ झालो. तेव्हा दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह केला आणि 71 हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याचा निकाल घेतला. जे कर्ज घेतात आणि वेळेवर फेडतात त्यांना जी 14% – 12% व्याजाचा दर होता तो 6% – 4% पर्यंत आणला, फक्त नियमित परत करणे ही अट घातली आणि कमी व्याजामध्ये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. शेतीमालाला किंमत दिली आणि आज जगातला शेती उत्पादन वाढवणारा महत्त्वाचा देश तुमचा-माझा भारत देश आहे.

लढाई आमदारकीची : शरद पवार की अजित पवार?, पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची स्फोटक मुलाखत

शिंदखेडला आल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या, माझे सहकारी संदीप बेडसे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनीही काही बाबी माझ्या कानावर घातल्या. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय, इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना 20-20 वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता ती लोकांवर खटले भर, त्यांना तुरुंगात टाक, त्यांना त्रास दे, सत्तेचा गैरवापर कर म्हणून वापरली जात आहे. हेमंत देशमुखांसारखा माझा एक सहकारी, एक प्रामाणिक माजी मंत्री की जो तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पडेल ते कष्ट करतो त्यांच्यावर खोटे खटले भरले. जे तुमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्या हेमंत देशमुखांना अटक केली जाते, तुरुंगात टाकला जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, याचा एक चमत्कारिक उदाहरण या तालुकामध्ये बघायला मिळतं.

सत्ता लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा माज डोक्यात शिरतो आणि एकदा सत्तेचा माज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीत जो अधिकार दिला तो लोकांची सेवा करण्याचा. एका बाजूने लोकांची सेवा करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्माद आहे. ज्यांना हा उन्माद चढलेला आहे त्यांना खड्यासारखं बाहेर काढायचं. त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. 20-20 वर्षे आमदारकी पण काही विकास नाही. रस्ते धड नाहीत. शेतीची अवस्था ठीक नाही. मग काय केलं काय ह्या 20-20 वर्षांमध्ये? काही कारखाने काढले? साखर कारखाने काढले? जी कारखानदारी होती तीही बंद केली. नव्या पिढीला एमआयडीसी मधून रोजगार दिला? काय केलं मग? आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते, नाशिकमध्ये वेगळं चित्र दिसतं. असं का? कारण गेली 20 वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात पावलं टाकली गेली नाहीत, अशी टिकाही त्यांनी केली.

Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, ज्यांनी हा ऐतिहासिक सोहळा आयोजित केला, या भागातल्या बळीराजाला निमंत्रित केलं आणि पांडुरंगावर ज्यांची श्रद्धा आहे त्या भजनी मंडळांनाही निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला ते प्रदेश सरचिटणीस संजय बेडसे, धुळे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे, शहर अध्यक्ष रणजित भोसले, जुने सहकारी एन.सी.पाटील, कामराज निकम, जुई देशमुख, डॉ. मनोज महाजन, मध्यप्रदेशचे आमदार श्री. सोळंकी, माजी आमदार दिलीप सोनावणे, बी एन पाटील, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, कल्पनाताई महाले, उषाताई पाटील, डॉक्टर कैलास ठाकरे व अन्य सगळे सहकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Share
Tags: dhule newsdhule politicssharad pawarsharad pawar dhulesharad pawar latest newsshindkheda news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू – शालेय शिक्षण विभागाची माहिती

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू – शालेय शिक्षण विभागाची माहिती

October 14, 2025
Important news! Exam dates for 10th, 12th announced, read in detail

HSC SSC Exam Dates : महत्त्वाची बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, वाचा सविस्तर

October 14, 2025
एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

October 14, 2025
Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

October 13, 2025
Update News:  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  आरक्षण जाहीर;  जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण  जाणून घ्या एका क्लिकवर

Update News: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page