जळगाव, 28 सप्टेंबर : गेल्या चार-पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागात मुसळधार पाऊस झालाय. या मुसळधार पाऊसमुळे शेतीपीकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यात पावसाचा जोर आजपासून कमी होणार आहे. दरम्यान, कोकण, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘या’ जिल्हयात आज जोरदार पावसाची शक्यता –
राज्यात आज देखील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर वर्धा वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
गेल्या चार दिवसांत जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. असे असताना जिल्ह्यात असलेल्या धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून विविध भागात मध्यम स्वरूपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव शहरात मुसळधार पावसाची हजेरी –
जळगाव शहरात काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जळगावकरांची दाणादाण उडाली. शहरात 25 मिनिट चाललेल्या या धुवांधार पावसामुळे रस्ते देखील जलमय झाले होते. दरम्यान, अचानक झालेल्या पावसामुळे जळगावकरांची तारांबळ उडाली. शाळा सुटण्याच्या वेळी पाऊस झाल्यामुळे स्कूल बस, व्हॅन तसेच वाहने एकाचवेळी रस्त्यावर आल्याने ट्राफिक जाम झाली. यावेळी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview