मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 8 सप्टेंबर : राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असताना जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावानजीक शेतात एक परिवार वास्तव्यास आहे. यातील 11 वर्षीय मुलगी ही शनिवारी सायंकाळी घराजवळ असताना संशयित तेथे आला आणि त्याने या मुलीला शेताकडे नेत अत्याचार केला. यानंतर संशियाताने डोक्यात दगड टाकून तिचा खून केला. दरम्यान, ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करत याबाबत माहिती दिली.
यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच यावेळी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. बालिकेचा मृतदेह रात्री उशिरा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान,जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपासाच्या सूचना केल्या.
हेही वाचा : Breaking : अडावद खून प्रकरण, पोलिसांनी केली चौघांना अटक, नेमकं काय घडलं?