वरसाडे (पाचोरा), 29 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील वरसाडे या गावी ह.भ.प. रामदासबाबा वरसाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या भव्य स्वरूपात अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, सोमवारी 30 ऑक्टोबरपासून या अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरूवात होणार आहे. या किर्तन सप्ताहाला साधारणतः 125 ते 150 वर्षांपुर्वीची परंपरा आहे.
दिंडी सोहळाही निघणार –
हा किर्तन सप्ताह 6 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सकाळी 5 ते 6 काकडा भजन, सकाळी 9 ते 11 गाथा भजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन तसेच संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री आठ ते साडेदहा या दरम्यान किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. वरसाडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हा किर्तन सप्ताह होणार आहे. तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दिंडी सोहळा निघणार आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान हा दिंडी सोहळा निघणार आहे.
कोणत्या किर्तनकारांचे किर्तन –
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 – श्री.ह.भ.प. विशाल महाराज, बोरनार
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 – श्री.ह.भ.प. प्रकाश महाराज, शिंदखेडा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. ताराचंद महाराज, आळंदी
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज, मुक्ताईनगर
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. नारायण महाराज, भडने
शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. समाधान महाराज, भोजे
रविवार, 5 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, आळंदी
सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 – श्री.ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, आळंदी यांचे सकाळी 9 ते 11 वाजता काल्याचे किर्तन होणार आहे.