• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

शेतकरी सेनेने मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न; हमीभाव खरेदी, डिझेल पुरवठा व पारदर्शक प्रक्रियेची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 19, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

पाचोरा, 18 मे: पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, ज्वारीसह विविध शेतीमालाच्या खरेदीदरम्यान वजन काट्यात तफावत होत असल्याचा मुद्दा शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केला. यानंतर तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेत बाजार समितीच्या कार्यालयात बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रशासनाकडून तात्काळ तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या रब्बी हंगामातील शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी बाजार समितीत आणत आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेला माल बाहेरील गोदामांमध्ये उतरवून तेथे वजन केले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. दोन वेगवेगळ्या भुईकाट्यांमध्ये सुमारे ३० किलोपर्यंत तफावत आढळल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव पाटील, ईश्वर पाटील तसेच शेतकरी प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन बाजार समितीचे सचिव आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडे निवेदन दिले. त्यानंतर तहसीलदारांनी बाजार समितीत तातडीची बैठक घेऊन संबंधित विषयाची माहिती घेतली. बैठकीला बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे, व्यापारी असोसिएशनचे मनोज सिसोदिया यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी सर्व वजन काट्यांची तपासणी करण्याचे तसेच तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. दरम्यान, शेतकरी प्रतिनिधींनी भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करा – शेतकरी सेनेचे मागणी
शासकीय हमीभावात वाढ जाहीर करण्यात आली असली तरी खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या संख्येनुसार खरेदीचा लक्षांक वाढवावा तसेच गोदामे व गोणपाटांची वेळेत उपलब्धता करावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरसाठी डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य दर, पारदर्शक प्रक्रिया आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा शेतकरी सेनेकडून व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, नाना वाघ, अरुण पाटील, एडवोकेट दीपक पाटील, जीभाऊ पाटील, संतोष पाटील, शरद पाटील, योगेश पवार आदी प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora market committeepachora newspachora shetkari senasuvarna khandesh liveweight discrepancies

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page