चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, माझ्या इज्जतीचा पंचनामा करण्यात आला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोड चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विधानसभेत केली.
काय म्हणाले आमश्या पाडवी –
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी ते बोलत होते. विधानसभेत बोलताना आमदार आमश्या पाडवी म्हणाले की, अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे काम चालू असताना माझी स्वत:ची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भांडण केली, आणि भांडण केलेले असताना मी तिथे गेलो असताना, माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर पोलीस ठाण्यातील निरीक्षक, पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे. म्हणून संबंधित जो डेप्युटी दुग्गड आहे. त्याच्यावर चौकशी करुन त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.
कारण कुणी आमदाराच्या मुलीला मारहाण करत असेल आणि तिथे गेल्यावर माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना, त्यांची चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या इज्जतीचा पंचनामा केला आहे, असे म्हणत अशा अधिकाऱ्यावर ताबडतोड चौकशी करुन कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विधानसभेत केली.
आमश्या पाडवींच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले –
आमदार आमश्या पाडवी यांनी जो विषय मांडला आहे, त्याचे गांभीर्य लक्षात घेता, तत्काळ वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
नेमकं काय आहे प्रकरण –
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला. यामध्ये नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या कन्या अंजू पाडवी या सोरापाडा येथील सरपंच आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्याविरोधात काम केल्याच्या रागातून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला गेला, असा आरोप तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे. तक्रार करणारी महिला ही भाजपची कार्यकर्ती आहे. तर त्या महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे. तर दुसरीकडे आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी यांनीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर फिर्याद दिली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.