• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 29, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अमळनेर तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

अमळनेर, 29 मे : क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलिम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे, असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ.अनिल पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गावा – गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत, असे मत त्यांनी मांडले.

आ. अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक –
यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंग मध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचा7 खेळ करून दाखविला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, 400 मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी मानले.

हेही वाचा : Video : “…..अन् आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner newsgulabrao patilsports complexsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page