• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 15, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : मोदी सरकार देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्यायव्यवस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे आणि एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. यासोबतच बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसेच केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश –
महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्यांच्या धर्तीवर एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली विकसित करावी, असे गृहमंत्री अमित शहा सुचवले. तसेच, 7 वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. पोलिस, सरकारी वकील आणि न्यायपालिका यांनी समन्वय साधून दोषींना शक्य तितक्या लवकर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, संगठित गुन्हेगारी, दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवली पाहिजे, जेणेकरून या तरतुदींचा गैरवापर होऊ नये. तसेच, कारागृहे, सरकारी रुग्णालये, बँका आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदविण्याची प्रणाली विकसित करावी.गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रला CCTNS 2.0 आणि ICJS 2.0 प्रणाली स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआरचे हस्तांतर सहज करता यावे यासाठी CCTNS प्रणाली विकसित करावी, असे सुचवले. गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. तसेच, राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता आहे. गृहमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, प्रत्येक पोलीस उपविभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅन्स उपलब्ध असाव्यात आणि फॉरेन्सिक तज्ञांची भरती वेगाने करावी. यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत.महाराष्ट्र सरकारने राज्यातील फिंगरप्रिंट ओळख प्रणालीला ‘राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली (NAFIS)’ शी जोडावे, असेही निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. तसेच, नवीन फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हेगारांकडून जप्त केलेली संपत्ती त्वरित मूळ मालकाकडे परत करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले. गृहमंत्र्यांनी पोलीस ठाण्यांचे सौंदर्यीकरण आणि सुधारणांवर भर देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. गृहमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा दर पंधरवड्याला एकदा आढावा घ्यावा, तर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांनी आठवड्याला एकदा याचा आढावा घ्यावा.

Video : “मोदी-शहांनी त्यांना भारतरत्न द्यावा; आमचा आक्षेप फक्त…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा पलटवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavismarathi newsnew criminal lawsNew Delhisuvarna khandesh liveunion home minister amit shah

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page