एरंडोल, 18 एप्रिल : उत्राण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांची युवासेना सोशल मीडिया एरंडोल तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी ही नियुक्ती केली असून सदर नियुक्तीपत्र एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक व्हा.चेअरमन अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र जाधव, माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी पं. स.सभापती अनिल महाजन, उत्राणचे सरपंच विनोद महाजन, शेतकी संघ संचालक पांडुरंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास चौधरी यांच्यासह एरंडोल पारोळा मतदारसंघातील शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI