ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 जून : जळगाव जिल्ह्यातील काही भागांत काल जोरदार वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये पाचोरा तालुक्यात केळी व काही फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
अमोल शिंदे यांनी बांधावर जाऊन केली पाहणी –
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना काल जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसाने झाले आहे. दरम्यान, भाजपचे अमोल शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर आज नगरदेवळा व नगरदेवळासीम या शिवारांत थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
तात्काळ पंचनामे करा –
अमोल शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. पाचोरा-भडगांव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी त्यांचा पुत्र शेतकरी पुत्र म्हणून मी सदैव त्यांच्या सोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. दरम्यान, शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला संपर्क करत तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी, याबाबत चर्चा केली.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview