मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 8 जुलै : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अनंत यांचा राधिका मर्चंट यांच्यासोबत 12 जुलै रोजी विवाह संपन्न होत आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याची पूर्व तयारी गेली अनेक महिन्यांपासून सुरु आहे. दरम्यान, या विवाह सोहळ्याची लग्नाची पत्रिका चोपड्याला पोहचली असून चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांना प्रत्यक्षात आज पत्रिका प्राप्त झाली.
चोपडा वासियांसाठी गौरवाची बाब –
मुंबई येथील ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’ मध्ये संपन्न होऊ घातलेल्या या ‘मंगल उत्सव’ समारंभास तमाम आपल्या मतदार बंधु-भगिनींच्यावतीने शुभेच्छा व शुभाशिर्वाद देण्यासाठी सोनवणे दाम्पत्य उपस्थित राहणार आहे. हे निमंत्रण म्हणजे चोपडा वासियांसाठी गौरवाची बाब असल्याचे आमदार लताताई सोनवणे व प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.
तीन दिवस विवाह सोहळा –
अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाच्या बॉक्समध्ये ठेवली आहे. तिचा लुक चांदीच्या मंदिरासारखा आहे. लग्नाचा सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे, हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. 13 जुलैला आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलैला स्वागत समारंभ होणार आहे.
जामनगरमध्ये प्री वेडिंग –
याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पूर्व सोहळा मार्च महिन्यामध्ये गुजरातच्या जामनगरात साजरा झाला होता. दुसरा विवाहपूर्व सोहळा मे महिन्याच्या अखेरीस युरोपमधील क्रूझवर साजरा करण्यात आला. या दोन्ही विवाह पूर्व सोहळ्यात बॉलीवूडच्या दिग्गज आणि जगभरातील कलावंताना आमंत्रण देण्यात आलं होते. दरम्यान, आता मुंबईत पार पडणाऱ्या विवाह सोहळ्याला प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांना आंमत्रण मिळाले असून ते उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा : मुंबईची ‘तुंबई’ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता, नेमकं काय म्हटलंय?