भुसावळ – भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
अनिरुद्ध कुलकर्णी यांना याआधी जून 2022 पासून ते जून 2024 पर्यंतच्या काळात या पदावर संधी मिळाली होती. या काळात त्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या शिफारसीनंतर आता त्यांची पुन्हा एकदा भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
अनिरुद्ध कुलकर्णी यांचा कार्यकाळ हा दीड वर्षांचा असेल. ते ऑगस्ट 2026 पर्यंत कामकाज पाहणार आहेत. दरम्यान, आगामी काळात या समितीच्या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास कुलकर्णी यांनी दिला आहे. अनिरुद्ध कुलकर्णी यांची भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
VIDEO : Amol Jawale : पहिल्यांदाच आमदार, अमोल जावळेंचं शेतकऱ्यांसाठीचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद