मुंबई, 6 मार्च : बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा एक व्हिडिओ एक्स पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकी बातमी काय? –
बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. अशातच आता अंजली दमानिया यांनी आणखी एक व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. दरम्यान, या व्हिडीओत सतीश भोसले हा नोटांची बंडले दाखवत आहे.
View this post on Instagram
अंजली दमानिया यांनी केली अटक करण्याची मागणी –
तसेच काही वेळानंतर नोटांची बंडलं हे कारच्या डॅशबोर्डवर फेकत होता. यात 500 रुपयांची बंडले दिसत आहे. त्यानंतर एक 200 रुपयांच्या नोटाचे बंडल डॅशबोर्डवर फेकून मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? कुठून आले एवढे पैसे? अटक करा या माणसाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हाच तो सतीश भोसले ?
कोण आहे हा ? कुठून आले एवढे पैसे? अटक करा ह्या माणसाला pic.twitter.com/vI53uRAer7
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 6, 2025
हेही वाचा : भडगाव-पारोळा तालुक्यातील ‘या’ चार गावांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन