• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! 5 लाख रुपयांची लाच घेताना PWD चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 10, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! 5 लाख रुपयांची लाच घेताना PWD चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, 10 मे: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांधकाम विभागात काल शनिवार 9 मे रोजी मोठी कारवाई करत एका शाखा अभियंत्याला रंगेहाथ अटक केली. प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तडजोडीनंतर 5 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अभिमन्यू अहिरे या शाखा अभियंत्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान, या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामे पूर्ण केली होती. मात्र, त्या कामांचे लाखो रुपयांचे बिल प्रलंबित होते. संबंधित बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बिल मंजुरीसाठी तब्बल 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीने रचला सापळा –

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.

अन् लाचप्रकरणी शाखा अभियांता एसीबीच्या जाळ्यात –

तडजोडीनुसार पहिल्या टप्प्यातील ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारताना एसीबीच्या पथकाने झडप घालत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना जागीच अटक केली. या कारवाईदरम्यान आरोपीच्या वापरातील निळ्या रंगाची बलेनो कार (क्रमांक MH-19-CV-2619) तपासासाठी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे (ला.प्र.वि., नंदुरबार कॅम्प जळगाव), पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगीता पवार, पोलीस कॉन्स्टेबल बाळू मराठे, प्रदीप पोळ आणि भूषण पाटील यांनी ही कारवाई केली. दरम्यान, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल काही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी केले आहे.

हेही वाचा: ‘….अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी!’,  विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: acb jalgaonanti-corruption bureau jalgaonbribe casejalgaon newsmarathi newsmarathi updatespwd branch engineer bribesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज  नेमका काय?

रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज नेमका काय?

June 25, 2026
राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

June 25, 2026
विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

June 25, 2026
भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ; राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ; राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

June 25, 2026
कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

June 24, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण; आई गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ चांदीचा रथ पालखी सोहळ्यास भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण; आई गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ चांदीचा रथ पालखी सोहळ्यास भेट

June 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page