नागपूर, 8 ऑक्टोबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ या चित्रपटातील अभिनेता नाव प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची हत्या करण्यात आली आहे. त्याचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड ध्रुव लाल बहादूर साहू यानेच त्याची निर्घृणपणे हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी ध्रुव साहूला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेकोसाबाग परिसरात राहणारा बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्याचा साथीदार असलेला ध्रुव लाल बहादूर साहू हा देखील कुख्यात गुंड होता. दोघांवरही चोरी तसेच मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि ध्रुवकुमारने दारूच्या नशेत छत्रीच्या हातापायभोवती वायर गुंडाळून त्याची सपासप शस्त्राचे घाव घालत हत्या केली. स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. यानंतर बाबूला तात्काळ मेयो रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
View this post on Instagram
पोलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविली असता, ध्रुव लाल बहादूर साहू हा बाबू छत्रीला रात्री नशेत असतानाच घरून घेऊन गेला होता असे त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान, बाबू छत्री हिची बहिण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून ध्रुव लाल बहादूर साहू विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर यांनी दिली आहे.
‘झुंड’ चित्रपटातून मिळवली लोकप्रियता –
निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात स्वतः नागराज मंजुळे तसेच बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत याने स्क्रिन शेअर करत बाबू छत्रीची भूमिका साकरली होती. दरम्यान ‘झुंड’ चित्रपटात बाबू छत्रीच्या अफलातून भूमिकेने तो सर्वदूर लोकप्रिय ठरला होता. मात्र, या घटनेमुळे नक्कीच सर्वांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :