भुसावळ, 29 मार्च : उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून गाडी क्र. 01211 बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल झाला आहे. दरम्यान, हा बदल 1 एप्रिलपासून लागू होईल, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ –
रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार गाडी क्र. 01211 बडनेरा ते नाशिक तसेच गाडी क्र. 01212 नाशिक ते बडनेरा या दोन विशेष मेमू गाड्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच गाडी क्र. 01091 व 01092 खंडवा ते सनावद विशेष मेमूला 29 एप्रिल 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बडनेरा-नाशिक मेमू रेल्वेच्या वेळेत बदल –
रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गाडी क्र. 01211 बडनेरा ते नाशिक मेमू रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, ही गाडी आता 1 एप्रिलपासून सकाळी 10.05 वाजता सुटेल. तसेच नाशिक येथे 19.05 वाजता पोहचेल. याआधी ही रेल्वे बडनेरा स्टेशनवरून 11 वाजून 5 मिनिटांनी सुटत होती.
बडनेरा ते नाशिक मेमू रेल्वेचं वेळपत्रक –
⦁ बडनेरा – 10.05 वाजता
⦁ मुर्तिजापूर – 10.30 वाजता
⦁ बोरगाव – 10.48 वाजता
⦁ अकोला – 11.02 वाजता
⦁ शेगाव – 11.33 वाजता
⦁ नांदुरा – 12.03 वाजता
⦁ मलकापूर – 12.38 वाजता
⦁ बोदवड – 13.37 वाजता
⦁ भुसावळ – 15.05 वाजता
⦁ जळगाव – 15.35 वाजता
⦁ पाचोरा – 16.05 वाजता
⦁ चाळीसगाव – 16.38 वाजता
⦁ नांदगाव – 17.20 वाजता
⦁ मनमाड – 17.50 वाजता
⦁ लासलगाव – 18.05 वाजता
⦁ निफाड – 18.25 वाजता
⦁ नाशिक – 19.05 वाजता
हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत