मुख्यमंत्रिपदासाठी सुरेश जैन यांच्या नावावर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते. त्याला बाळासाहेब ठाकरेंची अनुमती घेणे तेवढे शिल्लक होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना ते नाव सांगितले, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘त्यांना जाऊन सांग की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठी माणूसच होईल.’ ‘मराठी माणूस’ ह्या एवढ्या एकाच मुद्यावरून त्यावेळी सुरेशदादा जैन यांचे मुख्यमंत्रिपद गेल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. वरळीत आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात ते आज बोलत होते.