जळगाव : जळगाव जिल्ह्यात 22 तारखेला एक धक्कादायक घटना समोर आली. जळगाव शहरातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीदरम्यान पोलिसांना एक तरुणी सापडली. या तरुणीची चौकशी केली असताना ही तरुण बांग्लादेशातील असल्याचे समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही तरुणी बांग्लादेशातून जळगावात कशी पोहोचली, याबाबत माहिती समोर आली आहे.
या तरुणीकडे पासपोर्ट, व्हिसा नव्हता. तरीसुद्धा ही 19 वर्षीय बांग्लादेशी तरुणी भारत-बांगलादेशाच्या सीमावर्ती भागातून कोलकाता येथून घुसखोरी करून भारतात आली. भारतात वेगवेगळ्या ठिकाणाहून ती मुंबईत पोहचली आणि त्यानंतर तेथून ती जळगावात आली, असे तपासात समोर आले आहे
जळगाव ते भुसावळ मार्गावरील हॉटेल चित्रकूट व हॉटेल यश येथे कुंटणखाण्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला एक बांग्लादेशी तरुणी आढळली होती. तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात रहिवासाविषयीचे कोणतेही कागदपत्रे नव्हते.
दरम्यान, पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिची आशादीप शासकीय महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.