मुंबई, 29 नोव्हेंबर : डिसेंबर महिना म्हटलं की, या महिन्यात नाताळ सण तसेच विविध सुट्या येतात. दरम्यान, यावर्षी डिसेंबर महिन्यात तब्बल देशात 16 दिवस बँकांना सुट्या असणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रात एकूण दिवस 8 दिवस बँक बंद असणार आहेत. तसेच सुट्यांच्या काळात इंटरनेट बैंकिंग, मोबाइल ॲप आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील. या सुट्या लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या आर्थिक कामांचे नियोजन डिसेंबरमध्ये करावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने करण्यात आले आहे
देशात 17 दिवस बँका राहणार बंद –
डिसेंबर महिन्यात विविध सुट्यांमुळे बँकांचे काम तब्बल 17 दिवस बंद राहणार आहेत. मात्र, सगळ्याच सुट्या सगळ्या राज्यांमध्ये समान नसल्याने प्रत्येक राज्यात सुट्यांची संख्या वेगवेगळी आहे. डिसेंबरमध्ये एकूण 5 रविवार आले आहेत. दुसरा आणि चौथा शनिवार धरून 7 साप्ताहिक सुट्या बँक कर्मचाऱ्यांना मिळतील. नाताळ आणि स्थानिक सण-उत्सव यांच्या काही सुट्या आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
महाराष्ट्रात बँकेचे काम किती दिवस असणार बंद? –
1 डिसेंबर – रविवार
8 डिसेंबर – रविवार
14 डिसेंबर – दुसरा शनिवार
15 डिसेंबर – रविवार
22 डिसेंबर – रविवार
25 डिसेंबर – नाताळ
28 डिसेंबर – चौथा शनिवार
29 डिसेंबर – रविवार
हेही वाचा : “त्यांना जे हवंय ते…..”, अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीनंतर संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे-अजित पवार यांना टोला