नाशिक, 7 सप्टेंबर : शिक्षक हा राष्ट्र विकासातील महत्वाचा स्तंभ असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त ’बिइंग ए टिचर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या माजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षक हा राष्ट्र विकासातील महत्वाचा स्तंभ –
या कार्यक्रमास प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, समाज व राष्ट्रविकासाची जडण-घडण करणारे स्तंभ शिक्षक असतात. शिक्षक हा समाज व राष्ट्राचा निर्माता मानला जातो. समाजाचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते.
शिक्षक दिवस माहिती –
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठीही हा दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा : नार-पार गिरणा नदीजोडसाठी मंत्रीमंडळाने दिली प्रशासकीय मान्यता, आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी?