• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावोगावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 18, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
गावोगावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 18 ऑगस्ट : “गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पंचायत समितीत झालेल्या तक्रार निवारण आढावा बैठकीत केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या महत्त्वपूर्ण सूचना –

पालकमंत्री म्हणाले की, जल जीवन मिशनची कामे गतीमान व्हावीत. ग्रामपंचायत कार्यालये, शाळा खोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी व पोहोच रस्ते या दैनंदिन गरजांशी निगडीत सुविधा वेळेत उभारल्या जाव्यात. ग्रामीण पाणंद रस्त्यांना आवश्यकतेनुसार VR दर्जा मिळवून द्यावा, यासाठी अभियंत्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवून शाळाबाह्य एकही विद्यार्थी राहू नये याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV बसविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत घरकुल, गोठे बांधकाम, अतिक्रमण, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम व ग्रामपंचायत विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल काय म्हणाल्या? –

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी घरकुलासह इतर तक्रारींचा निपटारा 8-10 दिवसांत करून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. “ग्रामपंचायत ते पंचायत समिती हा महत्वाचा टप्पा असून येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सेवा दिल्यास योजनांचा खरा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचेल,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच बोलणार ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी गटविकास अधिकारी सरला पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती –

सदर बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्दन आप्पा कोळी, हर्षल चौधरी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश आप्पा पाटील, रवी कापडणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalgaon newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page