ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मधू काटे, देविदास वाघ, भागवत महालपुरे, सुभाष पाटील, नाना अहिरे, ज्ञानेश्र्वर चौधरी , सिकंदर तडवी , सागर भाऊ, भिला पवार, अण्णा मराठे, आबा बच्चे, शंकर पवार, गोकुळ परदेशी, अशोक गायकवाड तसेच ग्रामपंचायत सरपंच उषाताई सुभाष पाटील, उपसरपंच शिकला ताई, रईसाबई तडवी , सतीश बाजीराव पाटील, आबा भगवान राठोड, आप्पा रामदास पाटील, आकाश भाऊ ग्रामपंचायत सदस्य तसेच पाचोरा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जल जीवन मिशन म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल जीवन मिशन राबविण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2019 रोजी या मिशनची घोषणा केली होती. ‘हर घर जल’ या संकल्पनेसह, भारत सरकारने 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी दिले जाते.