नवी दिल्ली, 31 जुलै : वादग्रस्त आयएएस अधिकारी महिला पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आले आहे. UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. पूजा खेडकर यांना काल 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे यावर काहीच उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.
पूजा खेडकर यांचे पद काढले –
पूजा खेडकर यांना यूपीएससीने दोषी ठरवल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतले आहे. तसेच त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नसल्याचेही युपीएससीने जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पूजा खेडकरांना अटक होण्याची शक्यता –
पूजा खेडकर यांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 जुलैपर्यंत वेळ देण्यात आली होती. त्यानंतर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली. पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणीत आता वाढ झाल्या असून दिल्ली पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी या याधीच पूजा खेडकरांवर खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता.
काय आहे संपुर्ण प्रकरण? –
युपीएससीने नागरी सेवा परीक्षा-2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला. आहे. या तपासणीतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले. त्यांनी यूपीएससी परीक्षा नियमांनुसार दिली नाही. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर पूजा खेडकरांविरोधात यूपीएससीने पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. दरम्यान, आज थेट पूजा खेडकर यांचे आएएस पद रद्द करण्यात आले आहे. तसेच त्यांना भविष्यात कुठलीही परिक्षा देता येणार नसल्याचे युपीएससीने म्हटले आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत