पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात भीषण अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला असून या घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. यावेळी पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी (MH14 BT 3576) रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी आहेत. पुणे – नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला. दरम्यान, या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये यात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…