पाटणा, 14 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत एनडीएने एकतर्फी मारल्याचे चित्र दिसून आलंय. एनडीएने 200 हून अधिक जागा मिळवत बिहारची सत्ता एकहाती प्राप्त केलीय तर तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला फक्त 36 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, बिहार हे भाजपसाठी महत्त्वाचं राज्य असून सत्तास्थापनेसाठी आता पुढील हालचालींना वेग आलाय.
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? –
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला असून भाजपने 102 पैकी तब्बल 90 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष सुरू असून नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? –
एनडीए – 202 जागा
- भारतीय जनता पक्ष (BJP) – 89
- जनता दल युनायटेड (JDU) – 85
- लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) (LJPRV) – 19
- हिंदुस्थानी अवाम मोर्चा (Secular) (HAMS) – 5
- राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) – 4
महागठबंधन – 35 जागा
- राष्ट्रीय जनता दल (RJD) – 25
- काँग्रेस – 6
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (मुक्ती) – CPI (एमएल) (एल) – 2
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – CPI (एम) – 1
- इंडियन इन्क्लूसिव्ह पार्टी (IIP) – 1
इतर –
- एमआयएम (AIMIM) – 5
- बहुजन समाज पार्टी – 1






