चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 13 मार्च : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली. भाजपने महाराष्ट्रातून 20 उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीमध्ये दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे.
तसेच या यादीमध्ये जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्याऐवजी जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या नेत्या स्मिता वाघ यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमधील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –
नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील
हेही वाचा : शिवमहापुराण कथेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे केले कौतुक