जळगाव, 9 जानेवारी : जळगाव महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाआधीच जळगाव भाजपने निवडणुकीत पक्षात बंडखोरी केलेल्यांना मोठा धक्का देत तब्बल 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
भाजपचा बंडखोरांना मोठा धक्का –
भाजपच्या जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या पत्रात नमूद करण्यात आलंय की, जळगाव महानगरपालिका निवडणुक 2026 मधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असताना पक्षशिस्त, धोरणे व निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते. तथापि आपल्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला व संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भाजपमधून तात्काळ हकालपट्टी –
या संदर्भात पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यानुसार खालील पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या आपण भूषवत असलेले सर्व पद समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेण्यात आलेला असून तो तात्काळ लागू राहील. या करिता खालील यादी प्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे दीपक सुर्यवंशी यांनी स्पष्ट केलंय.
- पाटील संगिता गोकुळ
- हर्षदा अमोल सांगोर
- बाविस्कर धनश्री गणेश
- बाविस्कर गणेश दत्तात्रय
- सपकाळे रंजना भरत
- कांचन विकास सोनवणे
- शिंपी प्रमोद शांताराम
- सपकाळे भरत शंकर
- बागरे हिरकणी जिवेंद्र
- चौधरी चेतना किशोर
- बारी मयूर श्रावण
- पाटील तृप्ती पांडुरंग
- पाटील सुनिल ज्ञानेश्वर
- विकास प्रल्हाद पाटील
- भोळे गिरीष कैलास
- कैलास बुधा पाटील (सुर्यवंशी)
- हेमंत सुभाष भंगळे
- जितेंद्र भगवान मराठे
- प्रिया विनय केसवानी
- चौधरी रुपाली स्वप्नील
- अंजु योगेश निबाळकर
- चौथे मयुरी जितेंद्र
- वंजारी जयश्री गजानन
- पाटील ज्योती विठ्ठल
- घुगे उज्वला संजय
- डाके दिनेश मधुकर
- मोरे कोकिळा प्रमोद
हेही वाचा : ‘नायलॉन मांजा विकल्यास किंवा वापरल्यास आता थेट….!’; जळगाव पोलिसांचा मोठा इशारा, वाचा सविस्तर बातमी






