• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : “…..पण या रगेलच्या नादी लागू नको”, भाजप आमदार सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 27, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : “…..पण या रगेलच्या नादी लागू नको”, भाजप आमदार सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा, नेमकं काय म्हणाले?

बीड, 27 डिसेंबर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आहेत. सुरेश धस हे सातत्याने नवे खुलासे समोर आणत सरपंच हत्या प्रकरणाचा खरा सुत्राधार कोण याचा पोलिसांनी शोध घ्यावा, याची मागणी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. यावरून सुरेश धस यांनी मिटकरींना जोरदार इशारा दिला आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले? –
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते करत असल्याचे दिसून येत आहे. सुरेश धस हे महायुतीचे आमदार आहेत. मात्र, आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. आणि दोघंही बहिण-भावांना मंत्रीपद मिळाले आणि पंकजाताई तसेच धनंजय मुंडे एकत्र आल्याने त्याचा पोटशूळ सुरू झाला आहे.

दरम्यान, आमचं म्हणणे आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येचं कोणी समर्थन करू शकत नाही. जो कोणी दोषी असेल, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ही भूमिका सुरुवातीपासून मांडली आहे. अशीच भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मांडली. पण आता या प्रकरणात सुरेश धस राजकारण करतात, हे कुठंतरी थांबले पाहिजे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभत नसून ते महायुतीचे घटक असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

सुरेश धस यांचा इशारा –
आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. धस म्हणाले की, “अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. माझी त्यांना एकदा विनंती आहे की, अमोल तू कुणाच्याही नादात लाग पण या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडलं. मी आता एकदा ऐकून घेतो वडिलकीच्या नात्याने एकदा त्याला समज देतो. तुझं कुणाकडंही दुकान चालवं…माझ्यावर दुकाने चालवू नको…तुझं अवघड होईल,” अशा शब्दात एकेरी उल्लेख करत सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना इशारा दिला आहे.

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण –
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणाबाबत नवे खुलासे करत विधानसभेत जोरदार आवाज उठवला होता. खरंतर, याप्रकरणाचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळीक मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर घेतला जात असल्याने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. दरम्यान, देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ठ केले आहे. असे असले तरी पुढील काही दिवस सरपंच हत्याप्रकरणावरून वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmla amol mitkarimla suresh dhaspolitical update newssuresh dhas critics on amol mitkarisuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page