जळगाव, 28 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी भाजपा जिल्हा महानगर तर्फे गोलाणी मार्केटमधील श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरात आज संध्याकाळी 6 वाजता आमदार सुरेश भोळे राजू मामा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे’, असे साकडे जळगाव भाजपकडून यावेळी घालण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामाचा व श्री हनुमंताचा जयघोष कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, तसेच जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष नगरसेवक, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री भाजपचाच! –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल त्यांची मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, आज रात्रीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होणार की भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..