• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजप विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, पुण्यात प्रदेश कार्यकारणीचे अधिवेशन, अमित शहांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
July 21, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
welcome of Union Minister Amit Shah in Pune

अमित शाह यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (photo -@Dev_Fadnavis)

पुणे : आज रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यातील ५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आदी नेतेही या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

असा आहे कार्यक्रम – 

पुण्यात बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजप प्रदेश कार्यकारणीचे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर साडेअकरा वाजेच्या सुमारास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्षीय प्रस्ताव असेल. दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे हे अभिनंदनाचा ठराव मांडतील. यानंतर दुपारी 12 वाजता नितीन गडकरी, तर दुपारी अडीच वाजता देवेंद्र फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी 3 वाजता अमित शाहांच्या भाषणाने या अधिवेशनाचा समारोप होईल.

महायुतीच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, यावर भाजपचा भर आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या काही चुका भाजपकडून झाल्या असतील, त्या आगामी काळात भाजपकडून होऊ नयेत, याप्रकारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि त्याप्रकारे आगामी विधानसभेची रणनिती ठरवली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानुसार, कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचार आणि तयारीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका प्रतिनिधी, पदाधिकारी आदी सहभागी होणार आहेत. दरम्यान, आजच्या या बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shahamit shah in punebjpbjp maharashtrachandrashekhar bawankuledevendra fadnavis

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

June 19, 2025
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंत्यसंस्कार

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंत्यसंस्कार

June 19, 2025
Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

June 19, 2025
सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

June 18, 2025
Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 18, 2025
Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 18, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page