• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 30, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
The monsoon session began with 'Vande Mataram' and 'Rajya Geeta',

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली

मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मं‍त्रिमंडळातील इतर मंत्रीगण तसेच विधानसभेचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय यावेळी सभागृहाला करून दिला.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली –

विधिमंडळाचे पावसाळी आज पासून सुरू झाले. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर आणि विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत लहानू शिडवा कोम, डॉ. श्रद्धा प्रभाकर टापरे आणि रोहिदास तात्यासाहेब देशमुख यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर व दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली –

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विधान परिषद सदस्य अरुण काका भिमराव जगताप आणि डॉ.रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. 

सभापती प्रा.शिंदे यांनी शोकप्रस्तावात डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कोल्हापूर येथे जन्मलेले नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विभागप्रमुख म्हणून 16 वर्षे कार्य करत संस्थेला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर पुण्यात इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सची स्थापना करून संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. विज्ञानाचा सामान्यांशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न विशेषत्वाने उल्लेखनीय होता. त्यांच्या विज्ञानकथांच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे कार्य केले.

सभापती प्रा.शिंदे यांनी अरुणकाका जगताप यांचे सामाजिक योगदानही अधोरेखित केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील भेंडी गावचे रहिवासी असलेले जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेमध्ये दोन वेळा निवडून येईपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समाजकार्य, शिक्षण संस्था, क्रीडा संघटना यामधून त्यांचा जनतेशी घनिष्ठ संबंध राहिला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आप्तस्वकीय हरपल्याची भावना आहे, असे सभापती म्हणाले.

डॉ. रामदास आंबटकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यकर्तृत्वाचा आढावाही सभागृहात मांडण्यात आला. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असलेले आंबटकर यांचा सहकारी संस्थांमध्ये मोठा सहभाग होता. ते 2018 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. विद्यार्थी चळवळीतील त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आणि कार्यकर्तावृत्तीने केलेले काम आजच्या काळासाठी प्रेरणादायी आहे, असे सभापतींनी नमूद केले.

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचे योगदान स्मरणीय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सभापतींनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025maharashtra assembly sessionmaharashtra assembly session 2025maharashtra news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page