मुंबई, 6 नोव्हेंबर : महायुतीत भाजपसह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांच्या रिपाई व इतर पक्षांचा समावेश आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. यावरुन शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेल्या मतदारसंघात भाजपमधील इच्छुकांनी बंडखोरी केली. याविरोधात भाजपने कारवाईने सुरुवात केली आहे.
भाजपची बंडखोरांवर कारवाई –
विधानसभा निवडणुकीत ज्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केलीय त्यांचावर भाजपने मोठी कारवाई केली. भाजपने बंडखोरांवर कारवाई केलेल्या पहिल्या यादीत एकूण 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव शहर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा समावेश असून भाजपमधून बंडखोरी केलेले डॉ. आश्विन सोनवणे यांच्यासह मयुर कापसे तसेच धुळे ग्रामीण मतदारसंघातून श्रीकांत करले आणि सोपान पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पहिल्या यादीत 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी –
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला महायुतीचा जाहीरनामा सादर; शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा