सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 25 जुलै : गेल्या काही काळापासून पारोळा शहरात अनेक समस्या असून त्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आधी दिलेल्या निवदेनातील एकही मागणी पुर्ण न झाल्याने पारोळा शहर भाजपच्यावतीने पारोळ नगरपरिषेदच्याविरोधात धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आला. दरम्यान, येत्या 15 दिवसांत मागण्या न पुर्ण झाल्यास भारतीय जनता पार्टीचे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, अशा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, भारतीय जनता पार्टी पारोळा तालुका व शहर यांच्या कडुन दि. 27 जुलै 2024 रोजी आपल्या कार्यालयात येवुन निवेदन देण्यात आले होते. परंतू आपण ते निवेदन कचऱ्याच्या टोपलीत टाकले असावे आम्हाला वाटते. कारण आम्ही निवेदनात मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांपैकी एकही मागणी पुर्ण झालेली दिसत नाही. पारोळा शहरातील नागरीकांच्या जिवाशी खेळण्याचे काम पारोळा नगरपालिका व प्रशासक करीत आहेत.
आमरण उपोषणाचा इशारा –
पारोळा नगरपरिषदेने प्रलंबित असलेल्या समस्या न सोडविल्याने नगरपरिषदवर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, 27 जुलै 2024 रोजी दिलेल्या मागण्या नगरपरिषदेने येत्या 15 दिवसांत पुर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागण्या पुर्ण झाल्यास पारोळा भाजपच्यावतीने नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नगरपालिका प्रशासनाला निवेदन देताना माजी खासदार ए.टी. पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, भाजपचे पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद शिरोळे, माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंद भिका चौधरी, सचिन गुजराथी, धिरज महाजन, अतुल पवार, जितेंद्र आनंदा चौधरी, किरण चौधरी, अशोक चौधरी, भागवत चौधरी, जितेंद्र पाटील, भरत महाजन, केशव लक्ष्मण क्षत्रिय, नरेंद्र राजपुत, छोटू चौधरी, अॅड. कृतिका आफ्रे, रेखा चौधरी, नरेंद्र साळी, कैलास चौधरी, माणिकलाल जैस्वाल, यश पाटील, वामन चौधरी, कृष्णा पाटील, मनोज चौधरी, राहुल ठाकरे, विद्या पाटील, कैलास पाटील, आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Breaking : ‘विधानसभेत कोणतीही युती नाही,’ मुंबईत राज ठाकरेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?