नवी दिल्ली, 2 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपची पहिली यादी जाहीर –
दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करत भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही –
भाजपकडून आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महायुतीच्या जागवाटपाचा तिढा सुटला नसल्याने महाराष्ट्रातील उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी (29 मार्च) रोजी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु असताना या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
भाजपचे प्रमुख नेते कुठून लढवणार निवडणूक –
वाराणसी – नरेंद्र मोदी
गांधीनगर – अमित शाह
कोटा – ओम बिर्ला
लखनऊ – राजनाथ सिंह
अमेठी – स्मृती इराणी
पोरबंदर – मनसुख मांडवीय
नौसारी – सी. आर पाटील
गुना – ज्योतिरादित्य सिंधिया
बिकानेर – अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)
अलवर – भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)
जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत
मथुरा – हेमा मालिनी
उनाव – साक्षी महाराज
पासगाव – कमेलश पासवान
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीबाबत अर्ज करण्याचे आवाहन