• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 22, 2026
in पाचोरा, Uncategorized, ताज्या बातम्या
लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

लासगाव (पाचोरा), 22 जुलै: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा यांच्या वतीने लासगाव येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 150 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

डॉ. सुनील गवळी व डॉ. सुहासिनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इम्रान खान, आरोग्य सेविका संगीता कावळे आणि आरोग्य सेवक किशोर पाटील यांनी 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व ब्लड प्रेशर तपासणी केली. यावेळी नागरिकांना संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, आजारांचे लवकर निदान आणि योग्य उपचार याबाबतही माहिती देण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषद मराठी शाळेत डॉ. सुहासिनी मोरे यांनी किशोरवयीन मुला-मुलींना पोषक आहार, व्यसनमुक्ती, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया तसेच जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला सरपंच मनीषा ज्ञानेश्वर बडगुजर, उपसरपंच वाहिद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पैठणकर, ग्रामविस्तार अधिकारी प्रशांत पाटील, मुख्याध्यापक वाल्मीक आहिरे, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटप्रवर्तक योगिता वाणी, आशा वर्कर विद्या धनगर, संगीता धनगर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान म्हणजे काय? –

राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज उपलब्ध आरोग्य सेवा देणे हा आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे. ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच ते दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

गाव पातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल, व आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: blood pressureblood sugarmarathi newsmy village healthy village campaignpachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page