संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 3 ऑक्टोबर : पारोळा येथील ऐतिहासिक बालाजी मंदिरात आजपासून ब्रह्मोत्सवाला सुरूवात झाली आहे. स्तंभरोपणाने या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असून या उत्सवाचे आयोजन 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावात साजरा होणार आहे.
बालाजी मंदिरात आजपासून ब्रह्मोत्सवाला सुरूवात –
ब्रह्मोत्सवाच्या प्रारंभासाठी बालाजी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून स्तंभरोपण करण्यात आले. यावेळी श्री बालाजी महाराजांना सर्वत्र शांतता नांदो, तसेच शेतकरी, कष्टकरी आणि मजूर वर्गासह सर्व देशवासियांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. बालाजी संस्थानच्या वतीने ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे वहन आणि रथोत्सव साजरा केला जाणार आहे.
रथोत्सव साजरा केला जाणार –
या कार्यक्रमाची सुरुवात स्तंभरोपणाने करण्यात आली. या धार्मिक विधीचे मंत्रोच्चार मंदिराचे आर्चक पुजारी हरीष पाठक यांनी केले, तर पूजनामध्येबालाजी संस्थानच्या वतीने ब्रह्मोत्सवाच्या निमित्त सालाबादप्रमाणे वहन आणि रथोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात स्तंभरोपणाने करण्यात आली. या धार्मिक विधीचे मंत्रोच्चार मंदिराचे आर्चक पुजारी हरीष पाठक यांनी केले, तर पूजनामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्तंभरोपण सोहळ्यात संस्थानचे प्रमुख पदाधिकारी मंगेश तांबे, केशव क्षत्रिय, प्रकाश बाविस्कर, डॉ. अनिल गुजराथी, ॲड. दत्ताजी महाजन, अरुण वाणी, संजय कासार, रावसाहेब भोसले, अरुण लोहार, रमेश भागवत, भटू शिंपी, चंद्रकांत शिंपी, राजेंद्र चौधरी, दिलीप शिरूडकर, प्रमोद वाणी, सोनू चौधरी, गुणवंत पाटील, रवींद्र वाणी, अमोल भावसार, डि. डि. वाणी, शालिक मिस्तरी, सुभाष चौधरी यांच्यासह स्वयंसेवक, भालदार, चोपदार, हमाल, बालाजी स्वयंसेवक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ब्रह्मोत्सवाचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक दिवस भक्तांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असणार आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत