• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगावात समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव, 14 एप्रिल: “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विशेष अधिकारी, अमोल कुलकर्णी,  कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री घुगे म्हणाले,भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण त्यात असमानताही आहे. ही असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मार्गच आपल्याला तारू शकतो. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सोशल मीडियाच्या युगातही सखोल अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्र, कामगार कायदे तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेतील योगदान नमूद करत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसतीगृहाच्या अंकिता गजरे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट पणे पोवाडा सादर केल्याबद्दल तीचे कौतुक करत तरुणांमधील कला व सामाजिक जाणीवेचे स्वागत केले. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांच्या यशाचा उल्लेख करत जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर दीपमाला काळे यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना समान संधी मिळाल्याचे नमूद करत, विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान ए.आय स्वीकारण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहनही  केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नायर आपल्या मनोगत म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य प्रत्येकाने आत्मसात करावे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चार महत्त्वाची मुल्ये आपण नेहमी लक्षात ठेवून अंगीकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात वंचित समाजाच्या वेदना, दारिद्र्य आणि सामाजिक विषमतेचे वास्तव अधोरेखित केले. आपल्या लेखन व चित्रकलेतून उपेक्षित घटकांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यावर भर देत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या साहित्याला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाचा आहे, तसेच हा गौरव जळगाव जिल्ह्याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, “मानवी हक्काचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून मानवी सन्मान व हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखनाचा सखोल अभ्यास आवश्यक असून केवळ जयंती साजरी करून थांबणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या उदाहरणातून सामाजिक समतेचा संदेश देत ते म्हणाले, भारताची तत्त्वज्ञान परंपरा ही सर्वांना समान दर्जा देणारी असून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समता, बंधुता व मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, शेतीकडे उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲपचा वापर करून शेती विषयक माहिती उपलब्ध करून द्यावी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेची तसेच विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी शेती व उद्योग क्षेत्रात संधी शोधून उद्योजक बनावे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री पाटील यांनी समता सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली व कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय,निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेशांचे वाटप तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. समाज कल्याण कार्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला  विविध पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, विध्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांनी केले.

हेही वाचा: झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat ratna dr babasaheb ambedkar jayantijalgaon dm rohan ghugejalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page