• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 15, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

मुंबई, 15 एप्रिल: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

डिजिटल बाजारपेठेची दारे उघडली –

महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’ विकसित केला असून तो ‍फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करता येतो.  लहान व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

२७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद –

सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद झाली आहे. व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका अशा विविध निकषांवर शोध सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना नजिकच्या लाभार्थ्यांची माहिती सहज मिळते आणि त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ घेता येतो. या उपक्रमातून ‘लोकल ते ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होत असून लघुउद्योजकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळत आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमंट गेटवे सुरू करण्याचेही नियोजन आहे.

डिजिटल प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी –

महामंडळाने वेबिनार, यूट्युब, आणि पॉडकास्टच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. व्यवसाय सुरू करण्यापासून ते वाढविण्यापर्यंतची प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक संवाद, विक्री कौशल्ये आणि आर्थिक नियोजन यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तज्ञ व्यक्तींमार्फत तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच प्रशिक्षणांचे व्हिडिओ महामंडळाच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर व फेसबुकवर उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

कागदपत्र पडताळणी सुलभ; डिजीलॉकर सेवा –

महामंडळाने डिजीलॉकर सेवा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. पुढील टप्प्यात महा-आयडी आणि आधार यांचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.

व्यवसाय वर्धन सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांची माहिती अपलोड करावी, तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: annasaheb patildevelopmentdigital initiativesmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page