जळगाव, 6 सप्टेंबर : राज्यातील विविध भागासह जळगाव जिल्ह्यात पाऊस पुन्हा परतलाय. मागच्या आठवड्यात झालेल्या संततधार पाऊस झाला असताना, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळाला. मात्र, आज पुन्हा दुपारपासून जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पाऊस कोसळतोय. एकीकडे जळगाव जिल्ह्यातील धरणसाठ्यात पुरेशी वाढ झाली असताना पुन्हा एकदा मुसधार पाऊस कोसळत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस –
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाचा अर्थात पोळ्यापर्यंत जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळाली. असे असताना दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अधूनमधून मोठया सरी कोसळत आहेत. तर काहीवेळ ऊन पडून पुन्हा मोठी सर येत असून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे युट्यूब चॅनल सब्सस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
जोरदार पावसाचा अंदाज –
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज मध्यरात्रीपर्यंत विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सध्यास्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे शेतपीकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जातेय.
हेही वाचा : “अमित भाईंनी जर सांगितलं तर…….,” एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले?